माझ्या चुलत मामी सौ. सुषमा संतोषराव कदम जहागीरदार, साप-वेळू, ( हल्ली सांगवी ता. बारामती, वास्तव्य भांडूप, मुंबई ) यांचे सख्खे मामा श्री. बर्गे साहेब-चिंचणेरकर, आमचे मित्र बारामतीचे वकील श्री. विशालराव बर्गे इनामदार - कोरेगावकर, समस्त बर्गे परिवार, कोरेगाव व चिंचणेर, जिल्हा सातारा यांच्यासह कर्तबगार परंतु दुर्लक्षित इतिहास राहिलेल्या मराठा वीरांना मानाचा मुजरा करून सदर छोटेखानी लेख समर्पित करतो.
जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय मराठा, जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव !!!
"श्रीमंत सरदार बर्गे घराणे यांचा संक्षिप्त इतिहास "
मराठा बर्गे, उपनाव निकम हे एक सूर्यवंशी मराठा घराणे आहे. निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे.
उत्पत्ति :
बहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे वा हल्ला थोपवू शकणारे शास्त्र वापरले. ते शस्त्र म्हणजे बर्गे / बरगे म्हणूनच असे शस्त्र वापरणारे ते बर्गे. बर्गे यांच्या मूळ पुरुषाला पाच मुले होती. त्यापैकी तीन मुले कोरेगावला ( जिल्हा सातारा ) व दोन मुले चिंचनेरला ( जिल्हा सातारा ) स्थायिक झाल्याने त्यांचा वंश वृक्ष फोफावला.
बर्गे कुळाचार:
नाव : बर्गे,
कुली : निकम,
जात : ९६ कुळी क्षत्रिय मराठा,
मूळ गादी : आभरण ( अभानेर - हे अलवर, जयपुर या जवळ राजस्थान ), कर्नाटक.
वंश : सूर्यवंश,
राजाचे नाव / पदवी : प्रभाकरवर्मा,
गोत्र : पराशर / मानव्य,
वेद : ऋग्वेद,
अश्व / वारू : पिवळा,
निशाण : ध्वजस्तंभी हनुमान,
मंत्र : गायत्री मंत्र,
कुल देवता : जोगेश्वरी,
देवक : उंबर, वेळु, सोन्याची रुद्राक्ष माळ किंवा कांद्याची माळ, कलंब.
( निकुंभ हे राजे रघुवंशी असल्याचे दावा करतात व ते अयोध्येहुन राजस्थानला आले. धूंदू नावाच्या राक्षसला मारुन धुंधर उर्फ़ जयपुर वसवनारे ते राजस्थानच्या पहिल्या आर्य लोकांपैकी आहेत. मराठा निकम हे निकुंभ राजे वंशज असल्याने त्यांचे खानदेश वर तसेच राजस्थान येथील भागावर स्वामित्व होते. पुढे राजस्थान येथील राज्य त्यांनी गमावले. खानदेश वर मात्र निकुंभानी अनेक शतके राज्य केले ८ व्या शतकापासून ते अगदी आजपर्यंत बरेचसे लोक तेथे आहेत. अल्लशक्ति , वैरदेव, कृष्ण आदि महत्वाचे राजे या घराण्यातून झाले.)
प्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे :
सरदार आनंदराव बर्गे
सरदार क्षेत्रोजीराव बर्गे
सरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे
सरदार खंडोजीराव बर्गे
सरदार सेखोजीराव बर्गे
सरदार राणोजीराव बर्गे
सरदार सखाराम बर्गे
सरदार बालोजीराव बर्गे
सरदार हैबतराव बर्गे
सरदार येसाजीराव बर्गे
सरदार सिदोजीराव बर्गे
सरदार साबाजीराव बर्गे
सरदार जानोजीराव बर्गे
ही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.
ऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :
बर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते.
सरदार बर्गेंच्या सरंजाम, जहागीर, मोकाशांबद्दल :
सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर
सिदोजी बर्गे कृष्णाजी नाईक वाघोजी कदम यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे प्रान्त कोरेगाव सरदारी जमावाच्या खर्चासाठी / बेग़मीस मोकासा जहागीर
सरदार सेखोजी बर्गे या पराक्रमी सरदाराने मराठेशाही करीता बाजी शिंदे यांच्यासोबत रामचंद्र पंत अमात्य हुकूमत पन्हा यांच्या सुचनेनुसार छत्रपति राजाराम व शुर सरदार संताजी राव घोरपडे यांच्यात मध्यस्ती केली पण ती यशस्वी झाली नाही. ह्यांना छत्रपतितर्फे "खासबरदार" ही अनमोल पदवी मिळाली. जंजीरा मोहिमेसारख्या अनेक लढाया त्यांनी गाजविल्या व सरंजाम, इनामे, वतने व बहुमान संपादित केले.
सरदार तुलाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे खंडाले महाल मोकासा जहागीर मिळाला.
कोल्हापुर रियासतीत छत्रपति घराण्याचे आप्त घाटगे घराण्यासंदर्भात सखाराम बर्गे यांचा सहकारी म्हणून ऐतिहासिक उल्लेख आहे.
सरदार तुलाजी बर्गे व सरदार साबाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोरेगाव मोकासा जहागीर
सरदार सिदोजी बर्गे, सरदार साबाजी भोसले, सरदार रामसिंग निंबाळकर याना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे उडतारे मोकासा जहागीर.
सरदार तुलाजी ( तुळाजीराव ) बर्गे, हुजूर सुभा , कोतवाल बंधू , सेनापती दाभाडे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे मोकासा जहागीर.
सरदार तुलाजी बर्गे, सरदार सिदोजी भोसले यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे बाहे गाव मोकासा जहागीर. सरदार तुलाजी बर्गे, सरदार प्रतापराव मोरे, सरदार व्यासो भुजबळ, सरदार उदाजी बंडगर यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोताळे बुद्रुक मोकासा जहागीर.
सरदार तुलाजी बर्गे, सरदार संताजी जाधव , सरदार पदाजी व मानकोजी बंडगर, किल्ले वर्धनगड यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे मेटे गाव मोकासा जहागीर.
छत्रपति शाहू राजे भोसले सातारकर यांनी बर्गे मंडळी कोरेगावकर यांना एक पत्र पाठवले होते त्यात त्यांनी समाकुल पांढरे सरदार व बालोजी बर्गे यांना सिदोजी व येसाजी बर्गे यांच्या विवाहास अडथळे आणु नये अशी ताकीद दिली होती.
चिंचनेर, खानापुर, तासगाव, सासुरवे, कोरेगाव सारखी अनेक गावे, महाल सरंजाम इनाम म्हणून तसेच बर्गे लोकांना पराक्रमबद्दल अनेक ठिकाणी शेत सनदा, हक्क सनदा, मान मिळाले होते.
ग्वालियर संस्थानातही बर्गे हे एक प्रमुख सरदार घराणे होते. " सरदार बर्गे कि गोठ " या नावाचा एक भाग ग्वालियर शहरात आहे. ते सरदार महादजी शिंदे यांच्यासोबत मध्य प्रदेशात जावून स्थिरवाले होते. ग्वालियर येथील इंग्रज आमदनीत सरदार बहादुर मेजर बर्गे यांनी जागतिक महायुद्धात सहभाग घेतला होता. सातारा जिल्हा प्रतिसरकार, तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पण बर्गे घराण्याचा मोलाचा वाट आहे. आजच्या काळात समाज जपून प्रगती करणाऱ्या मराठा मंडळीतही बर्गे प्रमुख आहेत आणि या घराण्यातून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, समाजसेवक, लोकनेते , सुशिक्षित असे समाज अग्रणी होवून त्यांनी देश सेवा बजावलेली आहे.
बर्गे घराण्याचे नातेवाईक हे प्रमुख मराठा ९६ कुळी घराण्यातील आहेत. तसेच ९६ कुळी मराठ्यांच्या उप कुळी, इतर प्रमुख सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजामी वतनदार आदींशी त्यांचे नातेसंबंध आहेत.
संदर्भ :
मराठा रियासत, शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, ९६ कुळी मराठ्यांवरील आधारित साधने, पानिपत व खर्डा पोवाडा, नवीन इतिहास संशोधन यावर आधारित.
लेखक : श्री. राहुल उर्फ तानाजीराव हणमंतराव भोईटे-सरनोबत.
तडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा.
2 comments:
आपण वर दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.माझे लहानपणी (१९६०) एक मित्र नेताजी बर्गे मु.धारवाड कर्नाटक यांचे घरी तलवारी पाहिलेल्या होत्या व त्या त्यांच्या आजोबांच्या होत्या...
Baccarat by Playtech - Playtech casinos
Playtech's Baccarat 바카라 사이트 is one of the most well-known and 바카라 entertaining Baccarat variants that have been developed by Playtech. 샌즈카지노
Post a Comment